जडला मजसी छंद वाचनाचा
जडला मजसी छंद वाचनाचा
जडला मजसी वाचनाचा छंद!
रिकाम्या उठाठेवी झाल्या बंद!!
वेळात वेळ काढून लागले वाचू!
सुवर्णकण ज्ञानाचे लागले साचू!!
कथा ,कादंब-या अन् कवितासंग्रह!
नाटकं,समिक्षा,ललितलेख,ग्रंथविग्रह!!
कुठल्याही साहित्याचं मज वावडं नाही!
त्या बाबतीतही कुणाशीही वाकडं नाही!!
तासनतास जमेल तेव्हा बसते मी वाचत!
आळस, निराशा जराही नाही मज जाचत!!
जवळी सदा माहितीचा खजिना असतो!
जो तो मलाच सारे प्रश्न विचारत बसतो!!
जिकडे तिकडे मलाच मिळतो मग मान!
माझेच ऐकण्यास आतुर असतात कान!!
असा वेळ माझा सत्कारणी लागतो छान!
ज्ञान माहितीचे होत राहते आदानप्रदान!!
असा किफायतशीर माझा वाचनाचा छंद!
ज्ञान मनोरंजनासवे मिळवून देई ब्रम्हानंद!!
वाचाल तरच वाचाल कुणी म्हटलेय खरे!
रिकामी डोकी असतात सैतानांचीच घरे!!
