STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

4  

Rohit Khamkar

Others

जबाबदारी

जबाबदारी

1 min
299

सगळे जळते आहे, रोखण्या कोणीच नाही.

झाले हातच ते हतबल, पाहण्या दृश्य ते भीतीच काही.


म्रुत्युच्या सागर लहरी, लाखो खेचून नेती.

ओशाळनार कधी हे चक्र, संकटे एका मागून एक येती.


भयंकर प्रलय तो, चालला या धरणीवर.

राग येत आहे आता, आपूल्याच करनीवर.


आता लढा एकजुटीचा, संपवण्या संकट सगळे.

चुकला कोनी जरी तर, फक्त जगतील कावळे.


महारोग तो त्याने असे गाठले, स्तब्ध झाले सर्व.

एकजुटीने मात त्यावरी, मग सुरवात नवे पर्व.


प्रत्येकाने घ्यायची आहे, आता एकच खबरदारी.

देशासाठी देशबंधुंनो आता, आपली हीच जबाबदारी.


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍