जबाबदारी...
जबाबदारी...
1 min
184
जबाबदारीचं नवं ओझं
गेलात तुम्ही टाकून,
नव्या जबाबदारीने मी
आणखी गेलाे वाकून...
जबाबदारी अंगावर
काेवळ्या वयात आली,
माझी सारी स्वप्न
विस्कटून बघा गेली...
नियतीचा खेळ सारा
लपंडाव कसा खेळताे,
जबाबदारी पेलून मी
परीस्थिती ती दशॆवताे..
बनलाे आता कणखर
जबाबदारी ही पडली,
नशिबाने दैवयोगाची
जबाबदारी ही पालटली..
