जाता पंढरीसी
जाता पंढरीसी
1 min
46
जाता पंढरीसी|शांती अंतरीची|
आस संगतीची|लाभतसे||............॥१॥
जात पात नसे|पवित्र पंढरी|
तल्लीन बावरी|भक्तीभावे||...........॥२॥
पाऊले चालती|वाट वारकरी|
स्नेह शेतकरी|लावीतसे||..............॥३॥
माळ तुळशीची|जपनाम मुखी|
भक्तगण सुखी|राहतसे||..............॥४॥
पदोपदी लीन|तव चरणांत|
हरी सुमनांत|प्राणप्रिया||..............॥५॥