जास्वंद
जास्वंद
1 min
115
नानाविध प्रकार जास्वंदाचे
लाल, पिवळे, गुलाबी रंगाचे |
सकाळी टवटवीत सौंदर्य उधळतात
संध्याकाळी मात्र कोमेजतात |
फुलपाखरे पक्षी होती आकर्षित
मनमोहक बाह्य स्वरूप लक्ष वेधीत |
केसांसाठी तर फारच उपयुक्त
रक्तदाब नियंत्रणासाठीचा घटक |
बाप्पाला आवडे हे लाल जास्वंद
सुगंध नसूनही मन होई स्वच्छंद |
