जाणता राजा
जाणता राजा
त्या गर्द काळोखात
भयभीत जनता होती
सडेतोड लढ्यासाठी
सूर्याची वाट होती...१
तडपला रत्न तेजस्वी
जिजाई मर्दानी पोटी
घडवले त्यांस अद्भुत
सूर्यतेज ओतूनी कोटी... २
स्वराज्य स्वप्न पाहिले
स्वयंभूची शपथ घेऊनी
मावळे जमवूले साथी
नवप्रेरणा चेतवूनी... ३
कैक आले रिपू गेले
मुघलदल चक्रावले
मुर्त अदम्य साहसी
युक्तीपुढे शक्ती ना चाले... ४
गडकिल्ले शान अनोखी
वैभवीच महाराष्ट्राची
आशीर्वत हेच चिलखत
पर्वा नच केली जीवाची... ५
सर्वधर्मीय बंधुसम त्यांसि
स्रीयांसाठी तारणहार
युगप्रवर्तक होणे नाही
आता पुन्हा या महीवर...६
जय हो माता जिजाऊ
जय जय हे शिवराया
प्रार्थिते यावे एकदा
मातल्या जनांस उद्धाराया... ७
