STORYMIRROR

Sanjeev Borkar

Others

3  

Sanjeev Borkar

Others

"जाणता राजा"

"जाणता राजा"

1 min
329

बोले शिवनेरी ! शिवराय माझा !

तो जाणता राजा! जनतेचा !१


शुर लढवय्ये ! खास घोडदळ

आणि पायदळ ! लष्करात !२


लष्कर छावणी ! किल्यांची मदार

उभी ही जंजीर ! तटबंदी !३


किल्ला रायगड ! शोभे सिंहगड

तो विशालगड ! किल्ले कोट !४


युद्ध कला तंत्र ! युद्धात नैपुण्य

नैसर्गिक गुण ! अद्वितीय !५


बुद्धिमान योद्धा ! गनिमी निपून

झेलले आव्हान ! मोठ मोठे !६


 तटी सागराच्या ! उभा सिंधुदुर्ग

अभेद्य तो दुर्ग ! बेटावर ! ७


होणे नाही कुणी ! दुजा असा राजा

वदे सारी प्रजा ! विरहाने ! ८


Rate this content
Log in