STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

इतिहास

इतिहास

1 min
352

या शाश्वत जीवनात दिसते सृष्ठीचा ह्रास

ज्ञान अंजन भरुनी शोधिते मी इतिहास

सुप्त मनात राहिला फक्त अज्ञातवास

अज्ञातवासात करिते मी संकल्प विकल्प....

कुठे आहे तो स्वप्न निर्मित जागृत विवेक

संकल्पनाच संपल्या साऱ्या भावना झाल्या मुक...

प्रखर प्रकाशाचा ज्योती गेल्या विरून

मतिमंद भावना हृदयात आहे उरून.....

विवेकशून्य जगात नाही शांती जीवास

चैतन्यात नाही उरला आता उल्लास.....

अपंग झाले हात पाय मन बुद्धिहीन

ह्रदय करतं मंथन अन जळतं माझ मन.....

ओंजळीत माझ्या ही विशाल जिम्मेदारी

काळजात आहे माझ्या प्रस्थापना भारी....

उगवतीच्या जागृतीला ध्यास समृद्धीचा

जनामनात जागवूया दिप आत्मविश्वासाचा..

 मीनाक्षी किलावत


Rate this content
Log in