STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

इतिहास महान

इतिहास महान

1 min
349

आपल्या भारत देशाची संस्कृती

उज्वल परंपरेचा इतिहास महान

लोकशाहीचा हक्क प्रत्येकाला

इथे नांदती सर्व जातीधर्म समान..।।

चंद्रावर चंद्रयान पाठवून

कर्तबगारांनी वाढविली आहे शान

370 /35 हटवूनी दिले जम्मू

कश्मीरला आजादीने वरदान.. ।।

पारतंत्र्याची ही जंजीर तोडूनिया

आम्ही झालो आहोत आता मुक्त

कोटी वंदन करावे या मायभूमिला

स्वातंत्र भारत झालाय आता सशक्त ।।

मालिन्य जावूनी मांगल्याचा वास

नांदो मनामनात बंधूत्व,सत्य,शांती

विश्वात मानवांचे उजळावया लल्लाट

वैरत्व भावनेच्या ढळू देत सर्व भ्रांती।।

होतेे भारतात पारतंत्र्याची जडता

आणले विरांनी महा परीवर्तन

आकाशी झेप घेतली त्वरेने

भारत भूमीला कोटी वन्दन..।।

कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत

स्वातंत्र भारत अखंड देश आहे

सुदृढ़ हातात आहे देशाची कमान

प्रगतीसाठी देवूया आपण साथ आहे..।।



Rate this content
Log in