STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते

इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते

1 min
242

आनंदाचे ढोंग करूनी कितीतरी वर्ष जाहली

आनंदाचे क्षण अजूनी वाट्यास आले नाही


खोटे अश्रू चेहऱ्यावर विसरुनी गेले माझे नयनी

दुःखाचा क्षण समोर येई अश्रू माझे सुकून गेले


शल्य मनाला कितीही टोचले सदा मी हास्य दाखवले

सहन नाही होत हे आता वेदना माझी भरून गेली


भावना अंतरीच्या माझ्या कोणीच ना जाणल्या 

दुःख जाणिले, जन्मी परी सुखाची चाहूल ना लागली


अजुनी माझे मन वाट पाहे दिवस येईल कधी सुखाचा

वाट बघायला जीव हा जडे आनंदाचा क्षण हा


शेवटी क्षण तो आला जवळी माझ्या

पण का जाणे आस ही संपत नाही


Rate this content
Log in