ईच्छा पूर्ती भजन
ईच्छा पूर्ती भजन
1 min
253
स्वामी गजानन गुरुवार दिनी
प्रसाद भक्षणी पाप हरे!!१!!
संत गजानन विजय हा ग्रंथ
वाचिता सनाथ होती जीवं!!२!!
ग्रंथ पारायण करा एकवीस
कामना सिद्धिस जाती सर्व!!३!!
अनाथाचा नाथ गजानन माझा
सकल समाजा उद्धरितो!!४!!
ईश गजानना घाला पायी मिठी
दुःखातूनी उठी संतदासा !!५!!
