ह्या वातावरणाला झालं तरी काय
ह्या वातावरणाला झालं तरी काय
1 min
460
समजत नाही मला
लागलाय उन्हाळा, उन तपायचे दिवस
ह्या वातावरणाला वेळ ना काळ
कधी पाऊस, तर कधी उन पडत
कधी मध्येच थंडी वाजते
उगीच का हा खेळ वातावरणाचा
ह्याला कळत कसा काय नाही की ती मला
आज भेटणार होती
माझ्याशी मनमोकळ्या गप्पा करणार होती
तुझ्या मनात का रे इर्षा झाली
खरच खूप राग आला आम्हाला
नाही भेटू शकलो आम्ही एकमेकांना
त्याला काही लाज लज्जा
दोघांना प्रेम करण्यात का याची अडचण
खरंच ह्या वातावरणाला झालंय तरी काय
