हुंकार
हुंकार
1 min
287
मित्रांनी मला दिली
प्रेरणा लिखाणाची
आणि शब्दात उमटली
कविता आयुष्याची
शब्दाने शब्द जुळवता
गणित शब्दात मांडले
शब्दरूपी जणू मोती
माझ्या कवितेत सांडले
उठवला आवाज तेव्हा
जिथे अन्यायाची सीमा झाली
शब्दाच्या तलवारीची
कवितेला धार आली
गळून पडला नवा खास
जिथे तिथे अहंकार
प्रकटला जगा समोर
माझ्या लेखणीचा हुंकार
आता मात्र कविता असते
भाकरी, बेकारी, दारिद्र्याच्या शोधात
गल्ली, उड्डाणपूल , तर कधी
माणसातील माणसाच्या शोधात
