STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

हट्टी चॉकलेटी बंगला...

हट्टी चॉकलेटी बंगला...

1 min
22.8K

आवडत्या किटकॅटचा सुंदर मनोरा 

स्वप्ननगरीत यावा माझ्या एकदा

कधी वाटे मनसोक्त खेळण्याची

उत्कट इच्छा व्हावी पूर्ण खूपदा...


तसा चॉकलेटचा चॉकलेटी बंगला

स्वप्नात दिसला हो मला अनेकदा

स्वप्नभंगाच्या खट्याळ व्याकुळतेत 

हुलकावणी देऊन गेला कित्येकदा... 


रोजचं त्याचं भुलवणारं नाटक पाहून 

रागाचा पारा एके दिवशी खूप चढला

मनमोहक रुपातला तो शहाणा, हट्टी 

सक्त ताकीद देऊनही नाही पिघळला... 


सगळं विसरून जरा माघार घेऊन 

त्याला प्रेमाने लडिवाळ साद घातली 

म्हणाला, घे स्वप्नात भरारी आलोच

बागडायला, जर तू थोडीशी हसली...


प्रेमळ विनवणीला मान देऊन खुशीत 

मनात माझ्या विसावला हसत-हसत

चाखला त्याचा गोड स्वाद बिनधास्त 

नि विदा केलं शेवटी रडत-रडत...


Rate this content
Log in