हत्ती
हत्ती
1 min
43
एक होती हत्तीन
नाव तीचे बसंती!!
डुलूडुलू चाली अशी
गुल होई बत्ती!!
सुपाएवढे कान तीचे
सोंड एकद लांब!!
शेपूट अशी छोटी
पाय मोठाले खांब!!
भार असा मोठा
सांभाळते तू कशी!!
किलकिले डोळे करून
बसे बाप्पा पाशी!!
सर्कशीत मिरवतेस
चेंडू असा खेळून!!
बॅटींग भारी करतेस
सर्वांना तू हसवून!!
अशी गोड बसंती
सर्वांची झाली लाडी!!
पाहण्यास तीला
भरून आली गाडी!!
