हत्ती...!
हत्ती...!
1 min
352
हत्ती म्हंटल की
गणपती आगमना पासून
सुरू होणारी कहाणी
गणपती विसर्जन करूनच
सारा घोषवारा चव्हाट्यावर मांडते
मग हौसे नवसे गवसे
सारे तोंड सुख घेतात
हात धुवून घेतात
आणि पुन्हा
स्वच्छ होऊन कामाला लागतात
घोषवाऱ्यावर प्रतिक्रिया देताना
आवर्जून सांगतात
बायकोचे बाबा खायचे दात
आणि दाखवायचे दात वेगळे असतात
तसच इथं असतं
पटलं मला आणि तेंव्हा पासून
गणपती मला आवडू लागला
आमच्या घरी गणेश उत्सव
मोठ्या उत्साहात पार पडू लागला
आणि हत्तीणीच पिल्लू सुद्धा
खायचे दात पाहण्याचा हट्ट धरू लागलं
यालाच म्हणतात
भावी पिढी घडवणं आणि
वारसा पुढे चालवणं
किती छान....!
