STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

हसला फळा शेवटी

हसला फळा शेवटी

1 min
340

हुरहूर दाटून आली होती 

शाळा आज भरणार बाई

मुलं सारी तर या दिवसाची 

मनातून वाट सदैव पाही.....


ती किलबिल ती अपूर्वाई 

पुन्हाऽऽ सुरू होणार आज

मैदानावर मुलं आज मित्रांसवे

खेळताना चढवणार नवे साज.....


शाळेतील ती प्रेमळ शिस्त 

डोळ्यापुढे आता येत होती 

' शाळा ' नावाची ही पवित्र वास्तू

मुलांच्या आवाजाने हो नाचती....


हसला बाई फळा शेवटी आता

नाचू लागले रंगीतसंगीत खडू

मुलांनो अरे खूप दिवसांनी भेटला

नका न एकमेकांची खोडी काढू....


साहित्याला गुण द्या
लॉग इन