हरवलेले ते दिवस
हरवलेले ते दिवस
1 min
411
सकाळ प्रहरी नाम
त्या भगवंताचे
गित गात त्या विठ्ठलाचे
स्वारी येई वासुदेवाची ।।1।।
डोक्यावर भरजरी टोपी
हातात टाळ चीपळया
काखेत झोळी
मुखी गुणगान भगवंताचे ।।2।।
हरवलेले ते दिवस
पुन्हा पुन्हा आठवणीत
रमतात मनात सारे
रंगुन जातात, रंगुन जातात ।।3।।
