STORYMIRROR

Sangita Pawar

Others

4  

Sangita Pawar

Others

हरतालिका

हरतालिका

1 min
194

हिंदू धर्मातील प्राचीन असे परंपरा

भाद्रपद तृतीयेला करी हरतालिका

धार्मिक वृत्ताचे पूजन, वाचन करूनी

उपवास करती महिला, कुमारिका||


वाळूचे शिवपिंड स्थापून करुनी

 करतात नवीन वस्त्र परिधान

निर्जळी उपवास करुनी पूजा करती

शिवपार्वतीच्या प्रतिमेस असे मान ||


संकल्प, सोळा ,उपचार पूजन

सौभाग्यलेणे अर्पुनि करती आरती

कथा वाचन करून नैवेद्य असे

पर्ण धारण करून फळे अर्पिती ||


शिव-पार्वतीची करुनी आराधना

 दीर्घायुषी पतीसाठी करी भक्ती

सौभाग्यवती वृत्त पालन करती

पाप, चिंता यापासून मिळे मुक्ती ||


Rate this content
Log in