हरपून गेले
हरपून गेले
1 min
189
होता सायंकाळ पसरे अंधार सारा
वाटे तू आहेस बाजूला येई मंद वारा
तुझ्या आठवणीत मन हरपून गेले
मध्यरात्र सरली डोळ्यास डोळा लागेना
प्रयत्न केला किती तरी झोप येईना
तुझ्या स्वप्नात माझे रात्र हरपून गेले
आशा होती मला तू येशील कधी तरी
माझ्या भावनांना जपशील कधी तरी
तुझ्या प्रतिक्षेत देहभान हरपून गेले
