हर हर महादेव
हर हर महादेव
1 min
231
बिल्वदल त्रिशूलाकार ते प्रिय महादेवाचे
ॐ नमः शिवाय जपणे शिवरात्रीला व्याधाचे
नंदी वाहन डमरूधारी भोला सांब शिवाचे
कैलास गिरी वास पार्वतीपती सदाशिवाचे
भूतगण भोवती भस्मविलेपन विरक्तीचे
गर्वहरण गंगावतरण जटेत धारेचे
भाली चंद्र धारी समुद्र मंथन देव दानवांचे
विष प्राशूनी नीलकंठ झाले महादेव देवांचे
तृतीय नेत्र करी भस्मसात मदनास दिव्याचे
तांडव प्रलयकारी विश्वात क्रोधित शंकराचे
