STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

होळीची पुरणपोळी...!

होळीची पुरणपोळी...!

1 min
385

सणावाराला पुरणपोळी

हमखास घरोघरी ठरलेली

होळीच्या दिवशी

होळीला पोळी जळलेली


हा हा करीत पोळी

एरंडाच्या फांदीवरून उडवायची

अन हळूच अलगद ती

वरच्यावर झेलायची अन परस्पर खायची


काय सुरेख बेत हा आपल्या

सणावारांच्या खाद्याचा

आठव आणतो अजूनही

सुख भोगल्या दिवसांचा


मऊ लुसलुशीत पुरणपोळी

त्यावर साजूक तुपाची धार

गरमागरम ताटात येता

घ्यावा वाटायचा तिचा समाचार


पुरणाची गोडी जरी तोंड पोळी

तरीही भाग्य असायचे प्रत्येकाच्या भाळी

सणावारी जमायची सारी मांदियाळी

वाटायचे घरीच आहे सारी आळी


आता गल्ली गेली आळी गेली

प्रगतीच्या बडीमारात पोळी दुरावली

आता घरी नांदायला वाटते सोकावली

पोळीच झाली आता मॉलवाली


पण आठवण आली तरी

डोळ्यात पाणी आणते

आजही घरोघरी सणावारी तरी

ती अजूनही आवर्जून घरी दिसते....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन