होळी
होळी
1 min
196
सज्जना सांगाती दुर्गुणाची होळी
खाये पुरण पोळी तूपां सवे!!१!!
तूप ते सात्विक सज्जनांचा रंग
भेटे पांडुरंग पंढरीचा !!२!!
पंढरी हे काया नसे अवगुणी
तेव्हा चक्रपाणी भेटतसे!!३!!
संतदास म्हणे शुद्ध होती भाव
अग्नी जाळे हाव संसाराची!!४!!
