होळी साजरी करू या
होळी साजरी करू या
1 min
165
होळी साजरी करु या
दुर्गुणाची, दुराचाराची होळी करु या
सद्गुण आणि सदाचाराने झोळी भरू या
चला मित्रांनो होळी साजरी करु या
वाईट विचारांच्या टोळी सोडून देऊ या
चांगल्या विचारांच्या आळीत फिरू या
चला मित्रांनो होळी साजरी करु या
निराशा अन् दारिद्र्याचे दहन करु या
सर्वाना मिळो माया प्रेमाचे वहन करू या
चला मित्रांनो होळी साजरी करु या
निरोगी नि सुखी जीवनाची आशा करु या
कोरोना लवकर संपो अशी प्रार्थना करू या
चला मित्रांनो होळी साजरा करु या
