हनुमान जयंती
हनुमान जयंती
1 min
3.0K
जय हनुमान दैवत माझे
सिंहासनी बहू साजे
कीर्ती त्रिभुवनी गाजे
अंतरी माझ्या सदा विराजे....
अश्यक्य ते शक्य
करावे ज्याने
त्याशी नमन माझे
जय श्री हनुमंता....
पाहावे ती पूर्व
ज्याने पाहिला प्रथम सूर्य
नाही धरिला गर्व
त्याचे चरण धरू सर्व....
सकल कार्याशी साधन
माझा श्री हनुमंत
गुणांचा गुणवंत
मला करी जो भाग्यवन्त....
आशीर्वाद तयाचा
लाभू दे आम्हास
जय श्री हनुमंत
पाव तू सर्व जनास...
प्रार्थना भोळी भाबडी
स्वीकारी तू हनुमंता
कृपा सदैव असुदे आम्हांवरी
आशीर्वाद तुझा लाभो सदा
आम्हा भाग्यवंता..!