STORYMIRROR

Dhanraj Gamare

Others

3  

Dhanraj Gamare

Others

हल्लीची परिस्थिती

हल्लीची परिस्थिती

1 min
367

अश्मयुगीन माणसाकडे कोठे 

धर्म आणि जात होती वेड्या , 

पण आजकालच्या बुद्धिमान 

माणसाच्या हातात आहेत बेड्या . 


हल्ली सारखी भांडणे 

होतात गोष्टींवरूनी थोड्या , 

हल्लीच्या माणसाला माणसाची 

ओढच नाही आहेत त्यांना व्यसनांच्या गोड्या .

 

हल्लीची मुले पहिल्या पावसात

दिसत नाही सोडताना होड्या , 

हल्लीच्या मुलांच्या असतात 

मोबाईलवरती जोड्या .


आमच्या वेळी आम्ही मजेत 

काढायचो एकमेकांच्या खोड्या , 

काही मुलांना म्हणायचो ये छोट्या , 

ये बारक्या , तर काहींना जाड्या .


आम्ही नदीत लहानपणी

खूप मारायचो उड्या ,

आताची मुले घाबरतात स्वीमिंग

पुलच्या पाण्याला थोड्या .


© धनराज संदेश गमरे 


Rate this content
Log in