STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

*"हल्ली तुझ्या व्यथांना"

*"हल्ली तुझ्या व्यथांना"

1 min
216

हल्ली तुझ्या व्यथांना

सलतोय बहर इथला

ऐसपैस डोळी भरला 

अन् छातीवरच बसला ...


रंगीत या फुलांना इथे

कां मोकळे रान नाही

सुरात गाणाऱ्या स्वरांना

अलवार साद नाही...


विरहात साथ देती

डोळ्यातील पाझर

पावसाच्या दुनियेत

आहे कुठे प्रेमाची धार ...


बागेत मोहळाचा भरला

भरगच्च जमावडा इथे 

फुलपाखरांस अटकाव 

ना कूठल्याच झळा कुठे..


सोडून दूर गेले स्वजन

दुःखात लोटले गरिबीत

कोणी घेण्यास तयार ना

आठवांचा बोजा बाजारात ...


पळवाट काढली रानावनात 

आळसीपणाने कळस गाठला

शोधतोय भाग्यरेषेत अम्रृत

नशिबाचेच भोग म्हणाला...


Rate this content
Log in