STORYMIRROR

Rutuja kulkarni

Others

3  

Rutuja kulkarni

Others

हक्काची छत्री

हक्काची छत्री

1 min
152

पाऊस आवडायला

डोक्यावर, 'घर', नावाची हक्काची छत्री

तर असायला हवी.

रोज चं घर नावाच्या छत्रीशिवाय

पावसातं भिजणार्‍यांना

कायं विशेष त्या पावसाचं??


पाऊस आवडायला

पावसाचा मोहं तरी व्हायला हवा.

पण पावसाची मजा घेण्यासाठी 

डोक्यावर, 'घर' नावाची हक्काची छत्री

तर असायला हवी..


पाऊस आवडायला

पावसातं आवडं म्हणून भिजायला

पाऊसप्रेमी असावं लागतं

रोज भिजून सुख पावसातं विरघळून जाणाऱ्यांना

पावसातं कायं रोमॅन्टिक वाटावं??

पाऊस आवडायला 

पावसाची नशा हवी.

डोक्यावर, 'घर', नावाची हक्काची छत्री

तर असायला हवी... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन