STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

हक्क नाही का?

हक्क नाही का?

1 min
534

नित्यनेमानेच जातो रोज ठेल्यावर

सांगतो अधिकार मदिरेच्याच पेल्यावर


वागला वाईट आयुष्यात कोणीही

चांगला होता म्हणावे त्यास मेल्यावर


माळली होती फुले केसात बकुळीची

गंध दरवळला किती ती दूर गेल्यावर


हिंडतो वणवण उपाशी पोर केव्हाचा

भाकरी मिळते जराशी काम केल्यावर


ठेवती का आश्रमाशी माय बापाला

हक्क नाही का तयांचा पोसलेल्यावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन