STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

हक्क जगण्याचा-कविता

हक्क जगण्याचा-कविता

1 min
27K


द्वेषापोटी बळी जातो आमचा जन सामान्यांचा

दररोजचे जगणे संघर्षाचे सवाल असतो उद्याचा

पोटाची खळगी भरणे हा मार्ग असतो नित्याचा

शांततेचे जीवन मिळावे हा हक्क आहे प्रत्येकाचा


कष्ट मिळावे दोन हाताना नको कुणाची लाचारी

फुकटचे जीवन जगणे हा भार आहे पृथ्वीवरी

आळस म्हणजे निराश जीवन आयुष्याचा नाश करी

सदा कष्टाचे जीवन देई मान सन्मान संसारी


कष्टाने मिळते भाकर त्याची चवच मिळते न्यारी

आयते बसून खाने हे पाप सदाचे डोक्यावरी

फुकटची श्रीमंती देई अशांतता जीवनभर

कष्टाचे जीवन देई सुख समाधान आयुष्यभर


कष्टाचे जीवन आहे आरोग्याचे खुले दालन

आळसाने अनेक रोगांची होते कायमची लागन

आळसाचे जीवन आहे अप्रगतीचे लक्षण

कष्टाने माणूस शोभून दिसतो हेच खरे शिक्षण


गुंडानाही शिक्षा व्हावी न्याय मिळावा लवकर

जरब बसवी त्यांना शिक्षेची कायद्या असावा कठोर

जगणे व्हावे आनंदाचे मुक्त संचार करण्याचे

गरीबानाही आधार मिळावा जीवन सुखी जगण्याचे


Rate this content
Log in