STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

हिरवी धरती-पद्य

हिरवी धरती-पद्य

1 min
27.7K


हिरव्या धरतीचे सपान

मला रातीला पडले

आल्या सरीवर सरी

रान सारे हे भिजले


रान हिरवे फुलले

त्याने मन भुलविले

गार वाऱ्याने खेळविले

हिरवे रान हे डोलविले


साऱ्या रानाला खुलविले

साऱ्या जीवाना बोलविले

हिरवे शिवार फुलले

ह्रदय आनंदाने भरले


स्वर घुमले रानात

आगळ्या, वेगळ्या ढंगात

गाणे मंजूळ स्वरात

पाखरांच्या थव्यात


दुःख मनाचे विसरून

धरतीचे हे वरदान

आशा उद्याची घेऊन

जगण्याला प्रेरणा देऊन


तारुण्याची आठवण

अंग भिजले सरीने

गावची मोकाट गुरेढोरे

मागे फिरती लहान, पोरे


उघडे धरतीचे दालन

झाडे, वेलींचे आकर्षण

शांती, सुख, समाधान

घ्या ह्या जन्मी भोगून


रान फुलांचे न्यारे रंग

कोमल, मऊ त्यांचे अंग

फुलपाखरे त्यांच्या संग

न्हाऊन निघाले त्यांचे अंग


Rate this content
Log in