STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Others

4  

Kalpana Nimbokar

Others

हिंमत माझी

हिंमत माझी

1 min
463

जगण्यातल्या तत्वावर

आहे मी प्रतिबध्द

सर्व आहे आकाश माझे

मिळवण्या मी झाले सिध्द


मी आहे चंडिका

मीच आहे रणरागिणी

मीच आहे जगन्माता

मीच शिवबाची हिरकणी


येतील कितीही संकटे

आता मागे वळणार नाही

टाकली ही कात आता

मी पून्हा हरणार नाही 


चढून जाईन मार्गातले

सहज राने अन् गिरीशिखरे

हिंमत पाहूनी माझी

भरतील जनाना कापरे


फुंकले आहे रणशिंग हे

तोडल्या बेडया परंपरांच्या

मी पुरून उरेन येथे

जरी पोळले आगीत वास्तवतेच्या


Rate this content
Log in