हिंदोळे ...
हिंदोळे ...
1 min
312
हे हिंदोळे कधी थांबणार ?
माहीत नाही मला .
पण , आताशा मजा यायला लागलेय ,
या हिंदोळ्याची .
कुठपर्यंत नेतील वाहून , अन्
कुठं मला सोडतील ?
माहीत नाही मला !
अन् आता पर्वा ही नाही .
आता या हिंदोळ्यांचा लगाम ;
मी घट्ट पकडलाय ,
बुडणार तर नक्कीच नाही .
आता
या हिंदोळ्यावर हिंदोळण्याची ,
सवय झालेय मला ,
आणि
अतिशय सफाईदारपणे ,
मी ढकलून दिलय , त्यांना ,
माझ्या अंतरंगातून बाहेर .
बाहेर त्यांचे फक्त तरंग उमटतात ;
उमटू देत !
हे हिंदोळे कधी थांबणार ?
माहीत नाही मला ,
कदाचित , माझ्याबरोबरच शांत होतील ;
एकदाच , कायमचे !
