ही रात्र
ही रात्र
1 min
160
काळजीने मनात म्हणतो ढळू दे कसेतरी ही रात्र
उद्याची पहाट असेल सोनेरी हा काळ सरू दे मात्र
बातम्याने वाढली चिंता रात्रीची झोप उडाली
मरणाच्या बातमीने काळीज धडधडू लागली
सैरभैर झालेल्या या मनाची थरकाप झाली
झालो मी गलितगात्र हा काळ सरू दे मात्र
काळ मोठा कठीण आहे जवळ कोणी येत नाही
निसर्गाने बनवलंय स्वार्थी मनात असून येऊ देत नाही
स्वतःचा जीव सर्वांना प्यारा कोणी धोक्यात घालत नाही
या विचारात संपतो दिवसरात्र हा काळ सरू दे मात्र
