ही रात्र इथे संपत नाही...
ही रात्र इथे संपत नाही...
1 min
193
ही रात्र इथे संपत नाही
सांग ना मना का खुळी प्रिती
ही रात्र इथे संपत नाही
मनी तुझी आठवण येते
का उगवत्या दिशेला ते
सोनरी दव पहाट न्हाते
ही रात्र इथे संपत नाही
मन तुझ्या सवे गुंतलेले
सांग ना मना का खुळी प्रिती
त्याच्या मनी प्रतिमा ती खोटी
ही रात्र इथे संपत नाही
श्वासात भास ते जपलेले
मनाच्या अशा लहरीवरी
नाव अधूनमधून डोलते
ही रात्र इथे संपत नाही
भय मनीचे ते ना हरते
मैत्री अशी जीवनाशी केली
संकटी जोडे नाळ गहिरी
ही रात्र इथे संपत नाही
सांग ना मना का खुळी प्रिती
