STORYMIRROR

Rutuja kulkarni

Others

3  

Rutuja kulkarni

Others

ही मोकळी हवा

ही मोकळी हवा

1 min
247

ही मोकळी हवा... 

तार हृदयाची छेडून जाते.

मनांतील त्या बंदिस्त भावनांना,

मोकळी वाटं देऊन जाते. 


ही मोकळी हवा... 

पर्ण कळ्यांना बहरं देते. 

जगं विहरू पाहणाऱ्या स्वप्नांना, 

ती खुले आसमंत देते. 


ही मोकळी हवा... 

शब्दांना नवे वलयं देते.

अपूर्ण राहिलेल्या एखाद्या कवितेला, 

पूर्णत्वाचा नवा रंग देते.. !! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन