हेमंत लक्ष्मी
हेमंत लक्ष्मी
हे हेमंत लक्ष्मी, तुझे नयन का गं मिटले?
घन हिम वर्षावाने धरतीचे रंग कसे विटले?
तुझ्या हातीचा सायंदीपही।
मलीन होई धुके वेढुनी ।
तुझ्या कंठीच्या मधुर वाणीला,
का गं करुणाघने वेष्टिले?॥
धरणीची भरली तू ओटी, विपुल सोने, धनधान्याने।
गृहलक्ष्मीचे अंगण सजले, आज तू दिधल्या दानाने।
असे देउनी दान अगणित।
समोर का तू कधीही न येशी?
गुप्तदान तव ऐश्वर्याचे।
देऊन आम्हा कधी न मिरवशी?
शांत,शीतल, दंवबिंदुपरी।
सोज्वळ, निर्मळ, वदन झाकिशी।
तरीही हे हेमंतलक्ष्मी,
तव कृपा तू आम्हावरी सदैव राखिशी।
नतमस्तक आम्ही तव चरणांशी।
नतमस्तक आम्ही तव चरणांशी॥