हे वेडे प्रेम पाखरु
हे वेडे प्रेम पाखरु
1 min
483
प्रियेस शोधते
हे वेडे प्रेम पाखरु
दिसता ती तिच्यात रमते//१//
प्रेमात रंगले
धरणी आणि आकाश
नवनवे रंग झळकले //२//
वेधकता भारी
प्रेम पाखरात आली
प्रेमास निवारा शोधणारी //३//
चंचल नयन
भिरभिरे सभोवार
शोधते नित्य प्रिय सजन //४//
वाट तिची पाही
शांतता नसे जीवास
हुरहूर रेंगाळत राही //५//
नजरेची भेट
गाठी प्रियेचे सान्निध्य
हे वेडे प्रेम पाखरु थेट //६//
