STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Others

3  

शिवांगी पाटणकर

Others

हे शंकरा करुणाकरा

हे शंकरा करुणाकरा

1 min
355

शंभो महादेवा हे शंकरा

भोलेनाथा करुणाकरा

ब्रम्हांडाधीशा गंगाधरा

हे शंकरा करुणा करा


घेऊनी तू अवतार

करशील दैत्य संहार

त्रिपुरारी सोमेश्वरा

हे शंकरा करुणा करा


तुझी नामे रे किती

सदाशिव कैलासपती 

दक्षिणामूर्ति महेश्वरा

हे शंकरा करुणाकरा


तुझा अखंड नाम जप करी

तुझ्या नामात रे गोडी न्यारी

देवाधिदेवा महाकाल सर्वेश्वरा

हे शंकरा करुणाकरा


तुझी कृपादृष्टी ठेव आम्हांवरी

आम्ही अजाण लेकरं सारी

शिव शंकरा कर्पूरगौरा

हे शंकरा करुणाकरा


तुझ्या चरणावर ठेवितो माथा

करवूनी घे सदैव तुझी सेवा आदिनाथा

महायोगी भैरवा पालनहारा

हे शंकरा करुणाकरा


Rate this content
Log in