हे कविते
हे कविते
1 min
559
अगं कविते तूच आहे माझे सर्वस्व
तुझ्यामुळे विसरले माझे अस्तित्व
सुख दुःख वेदना असु देत यातना
अंगी असती तव कळा या नाना
प्रगल्भ होऊन मनावर उमटतेस
माझ्या मनातही तू प्रकट होतेस
तव प्रतिभाशक्तीच्या ओंजळीने
ठेवतेस ठसा तू हृदयावरी प्रेमाने
नवशिक्यांच्या यशाचे तूच गुपित
बहरतेय कल्पनाविश्व बंद कुपित
तव निर्मितीला हवे ताल नि लय
सारस्वतांचे असते वेगळेच वलय
शब्दांमध्ये साधावेच अचूक यमक
काव्ययशाचे यातच दडलेय गमक
