STORYMIRROR

प्रमोद राऊत

Others

3  

प्रमोद राऊत

Others

हे हसणे

हे हसणे

1 min
144

काल तिला पाहिले

पण उदास मन दिसले

न बोलताच समजल

काहीतरी घडलं पण

नाही एक अक्षर विचारलं

वाटलं होतं सांगेल

दुःख अंतरीचे त्यात

समजेन मी विश्व सुखाचे

होत होत वेळ गेला

प्रश्न अनुत्तरित राहिला...

तिचा हुंदका गळी आला

डोळ्यात आसवांचा सागर भरला

बस फक्त भरलेल्या डोळ्यांनी तिनं पाहिलं

न बोलताच रागात निघून गेली

मग मन भानावर आले तेव्हा समजल

ती ती नव्हती जिला तु जिकल

ती ती तिच्या विचारातून मनात तयार झालेला

स्वप्न गंध होता खरच

जीवनाचे ते एक पुष्प आज अनुभवले


Rate this content
Log in