STORYMIRROR

Arun V Deshpande

Others

3  

Arun V Deshpande

Others

हे बंध रेशमाचे

हे बंध रेशमाचे

1 min
565

लाभलेत माणसाला अनेक रंगी

भावनिक नाते,हे बंध रेशमाचे


पारिवारिक, सामाजिक नाते

यात सर्वाधिक आहे ते फक्त

परस्परातील घट्ट मैत्रीचे नाते


जीवन प्रवासात हर एक वेळी

असते सोबत व्यक्ती दरवेळी

मित्र नाव आहे या माणसाचे

पाठीशी असतो मित्र हर वेळी


कृष्ण-अर्जुन, कृष्ण- सुदामा

जोड्या मित्रांच्या ख्यात जगी

जीव लावतो मित्र जीवाला

नाते मैत्रीचे श्रेष्ठ आहे या जगी

--



साहित्याला गुण द्या
लॉग इन