हाती आता काही उरलं नाही
हाती आता काही उरलं नाही
आपण कशासाठी जगतो
कारण जाणले मी माझ्या मना
खऱ्याची दुनिया नाही इथे
जो तो दुसऱ्यास फसण्या बघतो
मनात विचारांचे वादळ
कसं ते थांबवायचे
हिशोब करीत मी बसले
कळेना कुणाचे काय चुकले
इथे नाती ही
सरड्या प्रमाणे रंग बदलती
नाती दिसे ही लोकांना
क्षणापुरती पेरलेली
हा मार्ग मला आडवळणाचा
वाटे मला हा चुकलेला असावा
मार्गात माझ्या फक्त अंधार दिसे
मनात विचारांचे सावट जसे
चांगल्यापणावर विश्वास माझा
उरला नाही आता
कारण इथे आता माझ्या
जवळचाच विश्वासघात करता
इतके सगळे पाश
बघुनी मी आता
कळू लागले मला इथे
नात्यांचा खरेपणा
कशी करू विश्वास
कशी जोडू मी ही नाती
सदा वाटे भीती मना
हाती आता काही उरलं नाही
