STORYMIRROR

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

हास्य

हास्य

1 min
239

दाविते तुम्हा

दागिना एक खास

शोभतो प्रत्येकास

चेहऱ्यावरी.


असो लहान 

वा कुणी मोठा

नसावा तोटा

हास्यास.


जगा असे

लपवुनि दुःखाचे आसू

वाटावे हासू

हळुवार.


लक्षण एक 

निरोगी,निस्वार्थी मनाचे

स्वस्थ तनाचे

निदर्शक.


करू संकल्प

आज या हास्यदिनी

फुलवू जीवनी

हास्यफुले.


Rate this content
Log in