STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

4  

Nurjahan Shaikh

Others

हार्दिक शुभेच्छा

हार्दिक शुभेच्छा

1 min
242

लाभो उदंड आयुष्य तुम्हाला 

उत्साह आज तुमच्या नववर्षाचा 

होवो आनंद द्विगुणित तुमचा 

दिवस आज हार्दिक शुभेच्छांचा 


सुर मिसळती संगीतातून 

शब्द घेती भरारी काव्यातून 

भाव उमटती कर्मकांडातून

कला गुणांच्या साक्षात्कारातून 


सुख समृद्धी तुम्हास लाभो 

दीर्घायुष्याची करुनी कामना 

सदा हास्य ओठांवर उमलो 

हीच मनस्वी शुभकामना 


आयुष्याच्या सुंदर वळणावर 

कार्यकर्त्यांच्या सहवासात 

 दीर्घायुष्याच्या आशिर्वादाने 

धर्म कर्माने फुले वसाहत 


आभाळभर होवो वर्षाव प्रेमाचा 

आशीर्वाद लाभो हीच सदिच्छा 

अनमोल या दिवशी तुमच्या 

वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा


Rate this content
Log in