गवतफुला
गवतफुला
1 min
154
गवतफुला का रे असा रूसलास
न बोलता काही मला कुठे लपून बसलास
कळतयं रे तुला की तुझ्या विना करमत नाही मला
तरी कसा मग तु माझ्यापासून दूर गेला
माहिती आहे तुला तुझ्या रंगात रंगते मी
तुझ्याच गंधाने सावरते अनं बावरते मी
गवतफुला तुझे ते गोजीरे रूप भावते मनाला
नको पाठ फिरवू रे हा अबोला कशाला
बोल न गवतफुला तु नको ना त्रास देऊ मला
मनाची घालमेल माझ्या का कळत नाही तुला
हिरवा रंग तुझा सोनेरी तुझी लोभस फुले
वाहताच खोडकर वारा ती वाऱ्यावर डुले
लळा लागला तुझा मला अनं विसरले देहभान
पाहताच तुला होते मन माझे असे बेभान
