गवसला नव्याने पुन्हा एकदा
गवसला नव्याने पुन्हा एकदा
1 min
421
दिसतं कधीकधी न वाचलेलं
स्वतःच्या बंद डोळ्यापल्याड
स्वतः जगलेलं झोप उडवणारं
स्वतःला मनोमन मिठी मारणारं
स्वप्नवेडं जगणं असं स्वप्नवत झालं
विसर ज्याचा ध्येयवेड्या मनातून
चालता चालता हळूच मागे सरलेला
वळून पाहता कोड्यात पाडणारा
उरलेल्या आशेनिशी जिद्दीने उभा
पुन्हा नवा सूर स्वतःत मिसळणारा
आत्मविश्वास हळूच डोकावणारा
सोबत पुन्हापुन्हा सुगंधित करणारा
रस्ता कधी काळी जणू चुकलेला
'मी'पणा नजरचुकीनं कवेत घेणारा
आज गवसला नव्याने पुन्हा एकदा
