गूढ स्मितरहस्य...
गूढ स्मितरहस्य...
1 min
132
माझा काव्यसंग्रह ‘स्मितरहस्य’
युवापिढीस भांडार प्रेरणांचा
रहस्याचा आहे गूढ शोधहास्य
मूक प्रश्नांना वेध कारणांचा
विषयांस विविध त्यात धार
विचारांची गवसेल शिदोरी
माझ्यासारखे अनेक ध्येयवेडे
शब्दांत पारखी ज्यांची उभारी
लेखणीतून विचारांचे समाधान
जाण आपलेपणाची वास्तविकता
विचार करण्यास करी प्रवृत्त मनास
स्फूर्ती नि प्रेमाची सकारात्मकता
ध्यास त्यात जगण्याची नवी उमेद
शब्दांचे मुक्त रान सुखद पेरलेले
भावभावनांचा शोध रेखाटलेला
स्वप्नपूर्तीचे स्वप्न आनंदात घेरलेले
