गुरुचे महत्व
गुरुचे महत्व
1 min
347
निसर्ग हा गुरुच आपुला तया नमन करू
वाहती सरिता ही ,अखंड ऊर्जेचे देते धडे.
उभे ताठ ते गर्द हिरवे झाड, सांगते सहनशक्तीचे पाठ.
येऊ दे वादळ वारे पाऊस धारा झेल तू म्हणे
किलबिल ती रान पाखरे सांगती हेच रे
बघ ती सानूली तृण लतिका सारे काही झेलते
आई तर प्रथम गुरू नमन करुनि पाय धरू
शाळेतील गुरूंचा सदा सन्माम करु
आयुष्य हे तर महान गुरू त्या कसे हो विसरू
जगा , अनुभवा घ्या ज्ञानाची शिदोरी भरभरून
