गुरुचे महत्व..!
गुरुचे महत्व..!
1 min
272

गुरू कोणाशी करावे
हा प्रश्न गहन
होत नाही त्रास
आता सहन
कोण म्हणे ऐकुन
धरावे चरण
जेणे पुढच्यास ठेच
मागचा शहाणा होय
कोण म्हणे
पाहून धरावे चरण
जेणे आंधळे
न होय कर्म
कोण म्हणे
गुरू करणे हा धर्म
मुळाशी न ठावे
काय असेल मर्म
तरी होते वाटचाल
शोधण्यास गुरू चरण
येता समीप
हळू हळू मरण
नसते काहीच
खरेच कारण
नसतात कोठेच
गुरू चरण
आपले आपण
व्हावे समर्थ
कशास लागती
मग गुरू चरण...
यालाच म्हणतात
झाले ज्ञान
जीवन जगण्या
अन साधण्या परमार्थ...
